का हो पांडुरंगा मज म
10.
का हो पांडुरंगा मज मोकलिले । पराधीन केले जिणे माझे ॥१॥
किती हे जाचणी संसार घसणी । करिती दाटणी काम क्रोध ॥२॥
आशा मनशा तृष्णा बहू या वोढाळ । लाविलासे चाळा येणे मज ॥३॥
निर्मळा म्हणे जीवीच्या जीवना । येऊ द्या करूणा देवराया ॥४॥
