वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 3. ज्ञानकांड रुपके › ७, विरहिणी अभंग ८७६ ते ९१३

येणे रूपे पाहावासी त

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074673 · अभंग क्र. ८८७

887.
येणे रूपे पाहावासी तरि असुमाय होसी ।
माझ्या मना नाकळसी सांवळ्या ॥१॥
सगुणपणाची तुझी पडिलिसे मिठी ।
केली जीवासाठी सांवळ्या ।
वेधला जिऊ माझा सिकवाल काई ।
सगुण ठाई वेधियेले ॥२॥
ये अंगणी अवचिता देखिला बोलता ।
कोण ऐसा निरूता न कळे गे माये ।
सगुण म्हणोनी धरू गेले पालवी ।
तव नवलपणाची ठेवी प्रगट केली ॥३॥
आंतु बाहेंरी काही नकळे वो मज ।
आपआपणिया चोज वाटोनी ठेले ।
बापरखुमादेविवरे माझे मीपण चोरूनी नेले ।
आपणा ऐसे केले बाई यावो ॥४॥

अर्थ :
सांवळे सकुमार सुंदर अशा रूपाने तुला पहावा तो तू माझ्या पोटांत मावत नाहीस. आणि मनालाही आकलन होत नाहीस. तरी पण हे सांवळ्या श्रीकृष्णा तुझ्या सगुणपणाची मिठी पडून मी आपल्या जीवाच्या संतोषाकरिता तुला मनांत धरून ठेवले. त्या सगुणरूपाच्या ठिकाणी माझा जीव वेधून गेल्यामुळे मी अशी वेडी झाले. मला तुम्ही किती शिकवाल. या माझ्या अंगणात अवचित बोलताना श्रीकृष्णास पाहिले तर हा कोण आहे असे खरोखर कळत नाही. तो सगुण म्हणून त्यांचा पदर धरू गेले तर त्यांनी आपल्या स्वकीय स्वरूपाची ठेव प्रगट केली. आता अंतरबाह्य मला काही दिसत नसून माझेच मला कौतुक वाटू लागले आहे. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीकृष्ण यानी माझा मीपणा चोरून नेऊन मला आपल्यासारखा म्हणजे परमात्म स्वरूप करून ठेवले. असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग