वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 3. ज्ञानकांड रुपके › ७, विरहिणी अभंग ८७६ ते ९१३

जीवाचिया जीवा प्रेमभ

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074641 · अभंग क्र. ८८८

888.
जीवाचिया जीवा प्रेमभावाचिया भावा ।
तुज वांचुनी केशवा अनु नावडे ॥१॥
जीवे अनुसरलिये अझुनी का नये ।
वेगी आणावा तो सये प्राणु माझा ॥२॥
सौभाग्यसुंदरू लावण्य सागरू ।
बापरखुमादेविवरू श्रीविठ्ठलु ॥३॥

अर्थ :
श्रीकृष्णा तू सर्व जीवांचा जीव, प्रेमाचे ही प्रेम असा आहेस. तुझ्यावांचून मला दुसरे काही आवडत नाही. सर्व भावाने मी तुला शरण आले आहे. पण तू अजून का येत नाहीस. त्यामुळे फार दुःख होत आहे. तो श्रीकृष्ण म्हणजे माझा प्राणच आहे. त्याला तुम्ही लवकर घेऊन येऊन माझी भेट करून द्या. त्या श्रीकृष्णाच्या सौंदर्याचे काय वर्णन करावे? सर्व सौभाग्य त्याचे ठिकाणी असून लावण्याचा तो साक्षात् सागरच आहे. असे ते माझे पिता व रखुमादेवीचे पती श्री विठ्ठल, यांना मी सर्व जीवाभावाने शरण आलो आहे. असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग