जय माय ज्ञानदेवी ।
430.
जय माय ज्ञानदेवी ।
शब्द-रत्न-जाह्नवी ।
प्राशिता तोय तुझे ।
सुख होतसे जीवी॥धृ० ॥१॥
अनर्घ्य साररत्ने ।
सिंधु मथुनी गीता ।
काढिली भूषणासी ।
वैराग्यभाग्यवंता॥जय० ॥२॥
अमृतसार वोवी ।
शुद्ध सेविता जीवी ।
जीवचि ब्रह्म होती ।
अर्थ ऐकता तेही॥जय० ॥३॥
नव्हती अक्षरे ही ।
निजनिर्गुणभूजा ।
बहेणि क्षेम देती ।
अर्थ ऐकता बोजा॥जय० ॥४॥
