विठो माझा लेकुरवाळा
429.
विठो माझा लेकुरवाळा ।
संगे लेकुरांचा पाळा ॥१॥
तुकोबा तो कडियेवरी ।
नामा करांगुळी धरी ॥२॥
एकनाथ खांद्यावरी ।
कबीराचा हात धरी ॥३॥
गोरा कुंभार मांडीवरी ।
चोखा जीवा बरोबरी ॥४॥
पुढे चाले ज्ञानेश्वर ।
मागे मुक्ताई सुंदर ॥५॥
बहेणि म्हणे बा गोपाळा ।
करिसी भक्तांचा सोहळा ॥६॥
