पूजावे कशाने जेथे जे
431.
पूजावे कशाने जेथे जेथे तू देवा ।
अन्नगंध पुष्प धूपदीपादी सर्वा॥धृ० ॥१॥
पूज्य पूजक जगदाभास जाला सगुणी ।
म्हणानिया तूते भजी कोदंडपाणी ॥२॥
दुजे तुजविण देखो तरीच अर्पावे ।
सर्वाठायी वोतप्रोत व्यापिले देवे ॥३॥
बहेणि म्हणे तुझे तुज अर्पिता लाज ।
वाटे रामा पुरी तुझे राखावे गूज ॥४॥
