आधी चैतन्य अपैते करो
1393.
आधी चैतन्य अपैते करोनी | मग संचरे तारुण्य वनी |कामक्रोध तुज देखोनी | जाती पळोनी बारा वाटा ॥१॥
तुज पाठी कवण धांवे | कवण टाकी कवण पावे |कामक्रोधे जग मोहावे | कासयासी खोवावे पोटी पाय ॥२॥
माया मोहजाळ तुटेल | पळेल पा काळ व्याळ |का रे स्मरसी ना गोपाळ | मिथ्या व्याकुळ कांजेविण ॥३॥
वैराग्य दृढ होई निरुता | कासया भितोसी चपेटघाता |परस्त्री तितुकी मानी माता विषयी निमित्या आल्यासाठी ॥४॥
धर्माचेनी मार्गे निघाला कर्ण | शिबी चक्रवर्ती जाला जीवित्वहीन |तयामाजी सांग नाडला कोण | लटकी झकवण का बोलती ॥५॥
इंद्रिया गोड ते आरोगिजे | मग धनीवरी धावा पोखरिजे |काय सांगू शहाणपण तुझे | खेचर विसा म्हणे अरे नामया ॥६॥
