वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 16. संत जनाबाई › 1. संत जनाबाई गाथा 350 अभंग › 1. संत जनाबाई अभंग गाथा › 23. नामदेवाचे गोणाईशी भाषण

माझा हा विठोबा येईल

🙏 16. संत जनाबाई · ABH-074008 · अभंग क्र. ३४५

345.
माझा हा विठोबा येईल गे केव्हा । जेवीन मी तेव्हा गोणाबाई ॥1॥
जाउनी राउळा तयासी तू पाहे । लवकरी बाहे भोजनासी ॥2॥
भरलिया रागे क्रोध त्याचा साहे । लवकरी बाहे भोजनासी ॥3॥
ज्ञानेश्वराघरी असेल बैसला । जाउनी विठ्‌ठला पाहे तेथे ॥4॥
जनी म्हणे देवा चला पुरुषोत्तमा । खोळंबला नामा भोजनासी ॥5॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग