हरीच्या भजने हरीचे भ
1421.
हरीच्या भजने हरीचे भक्त हरीचे भक्त ।
झाले विख्यात भूमंडळी ॥१॥
तरोनि आपण तारिले आणिका ।
वैकुंठनायका प्रिय झाले ॥२॥
ज्यांचे ध्यानी मनी हरी ।
राहिला निरंतरी दृष्टीपुढे ॥३॥
निळा म्हणे अवघेचि सांग ।
केले उभय भोग भोगुनिया ॥४॥
