म्हैसीपुत्रामुखे बोल
1422.
म्हैसीपुत्रामुखे बोलवणे श्रुती ।
चालवणे भिंती बैसोनिया ॥१॥
नव्हे हा सामान्य महिमा संतांचा ।
नैवेदय हातीचा मूर्ती जेवी ॥२॥
उदकामाजी वह्या ॥ ठेऊनी कोरडया ।
दाखवणे रोकडया विश्वजना ॥३॥
निळा म्हणे तिही संगेंची तारणे ।
दीने उध्दरणे नवल कोण ॥४॥
