वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 10. निवडक अभंग › 2. संत ज्ञानेश्वर निवडक अभंग

दिप दिपिका शशी तारा

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-072860 · अभंग क्र. ७

7.
दिप दिपिका शशी तारा होतुका कोटीवरी रे ।
परि न सरे निशि नुगवे दिवसु दिनकरनाथे जयापरी रे ॥१॥
नुद्धरिजे नुद्धरिजे नद्धरिजे गोपाळेंविण नुद्धरिजे ॥२॥
नगर भ्रमता जन्म जावो परि प्रवेशु एक्या द्वारे रे ।
तैसे यजिजो भजिजो पूजिजो परि उकलु नंदकुमरु रे ॥३॥
सर्वावयवी शरीर सांग परि विरहित एका जीवे रे ।
तैसा धिकू तो श्रोता धिकू तो वक्ता जो वाळिला विठ्ठलदेवे रे ॥४॥
गळित शिर हे कलेवर रे उद्केविण सरिता भयंकर रे ।
रविशशिवीण अंबर तैसे हरिविण जिणे ते असार रे ॥५॥
अंत:करणी रुख्मिणीरमणु परि त्या श्र्वपचाहि बंधन न घडे न घडे न घडे रे ।
येरु यति हो का भलतैसा परि तो भवाग्निहूनि न सुटे न सुटे न सुटे रे ॥६॥
शिखिपक्षी पत्री डोळे जेवि अकाळ जळद पटल रे ।
तैसी गोकुळपाळकबाळेंविण कर्मे सकळ विफळ रे ॥७॥
यम नियम प्राणायम प्रत्याहार हे सकळ उपाय परि अपाय रे ।
जंव तमालनील घन:सांवळा हृदयी ठाण मांडुनि न राहे रे ॥८॥
मी उत्तम पैल हीनु भुत द्वेषाद्वेष ठेले रे ।
केलेनि कर्मे उफखा निपजे सुख ते दुरी ठेले रे ॥९॥
आता असोत हे भेदाभेद आम्ही असो एक्या बोधे रे ।
बापरखुमादेविवरु विठ्ठल निवृत्ती मुनिराया प्रसादे रे ॥१०॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग