वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

(आरत्या)

🙏 3. संत तुकाराम · ABH-079880 · अभंग क्र. ४०८४

4084.
(आरत्या)
परमानंदा पुरुषोत्तमा रामा । अच्युता अनंता हरी मेघश्यामा ।
अविनाश अलक्षा परता परब्रह्मा । अकळकळा कमळापती न कळे महिमा ॥१॥
जय देव जय देव जया जी श्रीपती । मंगळशुभदायका करीन आरती ॥धृपद॥
गोविंदा गोपाळा गोकुळरक्षणा । गिरिधरकर भवसागरतारक दधिमंथना ।
मधुसूदन मुनिजीवन धरणीश्रमहरणा । दीनवत्सल सकळा मूळ जयजय निधाना ॥२॥
विश्वंभरा सर्वेश्वर जगदोध्दारा । चक्रधर करुणाकर पावन गजेंद्रा ।
सुखसागर गुणआगर मुगुटमणी शूरा । कल्याणकैवल्यमूर्ती मनोहरा ॥३॥
गरुडासना शेषशयना नरहरी । नारायणा ध्याना सुरहरवरगौरी ।
नंदा नंदनवंदना त्रिभुवनांभीतरी । अनंतनामी ठसा अवतारांवरी ॥४॥
सगुणनिर्गुणसाक्ष श्रीमंत संता । भगवाना भगवंता काळकृदांता ।
उत्पत्तिपालनपासुन संहारणसत्ता । शरण तुकयाबंधु तारी रिति बहुता ॥५॥

अर्थ :
हे परम आनंद देणा-या परम पुरुषोत्तमा, रामा, अच्यूता, अनंता, हरी, मेघाप्रमाणे शरीर असणा-या, हे अविनाशी लक्षात न येणा-या, परब्रम्हाचाही पलीकडे असणा-या तुझे कार्य न कळणा-या लक्ष्मीपते तुझा महिमा कळतच नाही. हे श्रीपती तुमचा मी त्रिवार जयजयकार करीत आहे तुम्ही अतिशय मंगलदायक असून शुभदायक आहात मी तुमची आवडीने आरती करीन. हे गोविंदा गोपाळा गोकुळ रक्षण करणा-या, आपल्या करंगळीवर गोवर्धनगिरी पर्वत धारण करणा-या, भवसिंधू हे दही मंथन करुन सर्वांना तारणा-या, हे मधू नावाच्या राक्षसाचा वध करणा-या, मुनीजणांचे जीवन असणा-या, धरणीचे श्रम हरण करणा-या, सर्व दीन लोकांचे प्रेमाने सांभाळ करणा-या व सर्व लोकांचे मूळ असणा-या देवा तू विजयाचे निधान आहेस. हे विश्वंभरा सर्वेश्वरा जगताचे उ

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग