वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

(आरत्या)

🙏 3. संत तुकाराम · ABH-079786 · अभंग क्र. ४०८५

4085.
(आरत्या)
पंढरि पुण्यभूमी भीमा दक्षिणावाहिनी ।
तीर्थ हे चंद्रभागा महा पातका धुनी ।
उतरले वैकुंठमहासुख मेदिनी ॥१॥
जय देवा पांडुरंगा जय अनाथनाथा ।
आरती ओंवाळीन तुम्हा लक्ष्मीकांता ॥धृपद॥
नित्य नवा सोहंळा हो महावाद्यांचे गजर ।
सन्मुख गरुड पारी उभा जोडुनि कर ।
मंडितचतुर्भुजा कटी मिरवती कर ॥२॥
हरीनाम कीर्तन हो आनंद महाद्वारी ।
नाचती प्रेमसुखे नर तेथिंच्या नारी ।
जीवन्मुक्त लोक नित्य पाहाती हरी ॥३॥
आषाढी कार्तीकी हो गरुडटकयांचे भार ।
गर्जती नाम घोष महावैष्णववीर ।
पापासी रीग नाही असुर कापती सुर ॥४॥
हे सुख पुंडलिके कैसे आणिले बापे ।
निर्गुण साकारले आम्हालागि हे सोपे ।
म्हणोनि चरण धरोनि तुका राहिला सुखे ॥५॥

अर्थ :
पंढरी ही अतिशय पुण्यभूमी असून तेथे भीमा नदी दक्षिण मुखाने वाहात आहे भीमा नदीची आकृती ही चंद्राप्रमाणे आहे त्यामुळे तिला चंद्रभागाही म्हणतात आणि जे भक्त चंद्रभागेत स्नान करतील त्यांचे महापातक देखील धुवून जातात. अशा प्रकारचे वैकुंठातील महासुख देणारे श्रेष्ठ वैकुंठ खाली पृथ्वीवर उतरले आहे. हे देवा पाडूरंगा तुमचा जयजयकार असो हे अनाथांच्या नाथा तुमचा जयजयकार असो तुम्ही लक्ष्मीकांत म्हणजे लक्ष्मीपती आहात मी तुमची आरती ओवाळीन. येथे नित्य नवा सोहंळा होत असून महावादयांचा गजर होत आहे आणि समोरच पारावर गरुड आपले दोन्ही कर जोडून उभा आहे. आणि तुम्ही तुमची दोन्ही हात कटेवर ठेवून आहात तुमची चतुर्भूज मूर्ती अतिशय सुशोभित दिसत आहे. महाव्दारामध्ये हरीनाम किर्तनाचा आनंद होत आहे आणि तेथे नर व नारी स्त्री व पुरुष हे प्रेमसुखाने ना

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग