मुरली धरुनी अधरीं ।
153.
मुरली धरुनी अधरीं । वाजवीं छंदें नानापरी । भोवते गोपाळ नाचती गुजरी । यमुनातीरी आनंदें ॥१॥
तो हा नंदनंदन गे माये । त्याचा वेध लागला मज सये । कांही केलीया तो न राहे । नाठवे देह गेह गे माय ॥२॥
स्थूल सूक्ष्म कारणांपरतां । चहु वाचा वेगळा तत्त्वता । आगमांनिगमांही वरतां । ज्याचा वेध शिवाचिया चित्ता गे माय ॥३॥
अचोच अवेदा चोजवेना । श्रुतीशास्त्रं नये अनुमाना । शरण एका जनार्दना । एकपणे जाणा सर्वा ठायी ॥४॥
