वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 16. मुरली - अभंग १४८ ते १६५

तुझे श्रीमुख सुंदर ।

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085737 · अभंग क्र. १५२

152.
तुझे श्रीमुख सुंदर । कुसुम शुभकांति नागर । कासें पीतांबर मनोहर । पाहुनी भुल पडली । करुणाघना ॥१॥
मुरली नको वाजवुं मनमोहना ॥धृ.॥
सर परता होय माघारा । देहभाव बुडाला सारा नाही सांसारासी थारा । भेदाभ्रम गेला । कमलनयना ॥२॥
ध्वनि मंजुळ ऐकिली कानी । सर्व सुखां जाली धनी । एका जनार्दनी ध्यानी मनी । एकपणा जगजीवना ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग