संसार ३९७६
3976.
संसार ३९७६
सांगतें तुम्हा वेगळे निघा । वेगळे निघून संसार बघा ॥१॥ संसार करिता शिणलेंभारी । सासुसासरा घातला भरी ॥२॥ संसार करितांशिणलें बहू । दादल्या विकून आणले गहूं ॥३॥ गव्हाचे दिवसे जेविली मावशी । मजला वेडीम्हणता कैशी ॥४॥ संसार करिता दगदगलें मनी । नंदा विकिल्या चौघीजणी ॥५॥ एका जनार्दनींसंसार केला । कामक्रोध देशोधडी गेला ॥६॥
