विषयी होऊनि उदास । स
3221.
विषयी होऊनि उदास । सांडीं संसाराची आस ॥१॥
ऐसी मुक्ताची वासना । मुमुक्षु चिंती तुझ्या चरणा ॥२॥
ब्रह्माज्ञान लाळ घोटी । येरी वाउगी ती आटी ॥३॥
शब्द निःशब्द खुंटला । एका जनार्दनी देखिला ॥४॥