अगम्य सामर्थ्य नयेचि
521.
अगम्य सामर्थ्य नयेचि गणना | तारुनि पाषाणा केले सम ॥१॥
तारिसी वानर अवघेचि सेना | तोडिसी बंधना पांडुरंगा ॥२॥
काय वनचर जाणती प्रत्यक्ष | परीक्षिति साक्ष दिस साता ॥३॥
कृतत्रेतद्वापारांचे आदि अंती | नामाचि ते ख्याति म्हणे नामा ॥४॥
