तुझिया कीर्तना कोण ज
520.
तुझिया कीर्तना कोण जाय आता | सख्या भगवंता कृपा करी ॥१॥
भीष्म पहुडला शरांचे पंजरी | तया प्रश्न करी युधिष्ठिर ॥२॥
महा भयेश्वरी विघ्ने निवारिता | सकळा देखता दांत पाडी ॥३॥
नामा म्हणे तुझी भक्ति अघटित | पवाडे अनंत दाविना का ॥४॥
