सर्व देवांमाजी विठ्ठ
522.
सर्व देवांमाजी विठ्ठल वरिष्ठ | बोलतसे स्पष्ट वेदशास्त्री ॥१॥
अच्युता अनंता माधवा मुकुंदा | गोपाळा गोविडणा गोप वेषा ॥२॥
कृष्णा कमलाक्षा कस्तुरीचा टिळा | नेसला पाटोळा खोचे शिरी ॥३॥
नामा म्हणे रामकृष्ण नारायण | तारिसी पाषाणा सिंधुमाजी ॥४॥
