रत्नजडित तव कौस्तुभ
677.
रत्नजडित तव कौस्तुभ ।
नलगे लाभ मज त्याचा ॥१॥
न लगे तुझी वैजयंती ।
भेटी चिंती चित्त तुझी ॥२॥
नलगे माणिक मुक्तामाला ।
भेटी डोळा तुझी पुरे ॥३॥
नलगे मुगुट हार कंठी ।
सुख वैकुंठीचे नको ॥४॥
बहिणी म्हणे कृपावंता ।
आस चित्ता भेटीची ॥५॥
