काय तुज वाटे मज भेटी
676.
काय तुज वाटे मज भेटी देता ।
कोण भय चिंता सांग उपजे ॥१॥
काय तुझे स्वरूपा पडे माझी दृष्टी ।
लपसी जगजेठी तया भेणे ॥२॥
तुझीया गोवळ्या करंट्या कपाळा ।
सांग माझा डोळा केवी लागे ॥३॥
काळ्या काजळाच्या काळाही सरसा ।
पांढर्या परिसा दृष्टि कै हो ॥४॥
बहिणी म्हणे नको प्रसंगी निर्वाणी ।
बर्या बोला झणी भेटी देई ॥५॥
