अजी सर्वन्याये ठकावल
572.
अजी सर्वन्याये ठकावले मन ।
तटस्थता जाण होउनी ठेली ।१॥
तेथे आता काय पुसावे सांगावे ।
स्वानुभव अंगे नाही जया ॥२॥
कीटकभृंगीन्याये जाली तद्रूपता ।
निमाल्या अवस्था चारी तेथे ॥३॥
बहिणीसी उन्मनी लागली अवस्था ।
भोगी त्यापरता ब्रह्मानंद ॥४॥
