वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

विषयांचा लंपट जरी तू

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076387 · अभंग क्र. ३३६

336.
विषयांचा लंपट जरी तू नसतासी ।
मग मना तुज संबंध काई ॥१॥
मग निजसुख सहज तू आपण ।
साधनांचा सीण कोणासाठी ॥२॥
सांडोनिया वृत्ति असतासी निवृत्ति ।
मग भोगप्राप्ती कोणालागी ॥३॥
बहेणि म्हणे मना विषयाचे संगती ।
एवढी आटाआटी करिसी जीवा ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग