सद्गुरूकृपेने साधीन
337.
सद्गुरूकृपेने साधीन तुझ्या कळा ।
वासना अबळा दंडीन मना ॥१॥
मग तू कीलवाणे करिसील भुख ।
तुझे तूचि सुख नेणसी घेऊ ॥२॥
अनाथाची परी होईल तुजलागी ।
ऐसे वीतरागी करीन झणी ॥३॥
बहेणि म्हणे तुझ्या सांडवीन खोडी ।
विवेकाची बेडी जडीन पायी ॥४॥
