वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

तुजसाठी मना जाईना ये

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-075915 · अभंग क्र. ३३५

335.
तुजसाठी मना जाईना येथोनी ।
राहीन चरणी सद्गुरूचे ॥१॥
मग तुझे काय चाले पाहे तेथे ।
येता तुज तेथे हाल होती ॥२॥
तुजसाठी मना घेईन देसोटा ।
धरीन मी निष्ठा गुरूपायी ॥३॥
बहेणि म्हणे मना ब्रह्मांडासगट ।
भरीन तुझा घोट गुरूकृपे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग