रडत माझे बाळ तान्हे
161.
रडत माझे बाळ तान्हे ॥समजाविते राहिना ॥धृ॥
नानापरी समजाविते ॥मागेल ते खाया देते ॥थोपटुनी निजविते ॥परी हा उगा राहिना ॥१॥
नानापरी करितो छंद ॥रडतो हा स्फुंद स्फुंद ॥नेत्रांतुनी वाहे बिंद ॥परी डोळा लागेना ॥२॥
पोटी धरूनिया दम ॥सर्वांगी सुटला घाम ॥एकाजनार्दनी प्रेम ॥यशोदेशी माईना ॥३॥
