राधे तुला पुसतो घोंग
160.
राधे तुला पुसतो घोंगडीवाला ॥घोंगडीवाला कांबळीवाला ॥राधे॰ ॥धृ॥
जमवुनि पोरे गेला यमुनेच्या तिरी ॥वांटितो गोपाळकाला ॥राधे॰ ॥१॥
रात्री माझ्या मंदिरी आला ॥निरोप सांगुनि गेला ॥राधे॰ ॥२॥
गळा वैजयंती माळा हाति घेऊनिया वेणू ॥नेसुनि पितांबर पिंवळा ॥राधे॰ ॥३॥
जनी म्हणे विठू हा धाला ॥गळा वैजयंती माळा ॥राधे ॥४॥
