धिंग्याचे धिंगुले खा
162.
धिंग्याचे धिंगुले खांद्यावर कांबुळे ॥नाचत तान्हुले येश्वदेचा ॥ग बाई येश्वदेचा ॥१॥
येती गवळणी करती बुझावणी ॥लागती चरणी गोविंदाच्या ॥ग बाई गोविंदाच्या ॥२॥
गोविंद बाळिया वाजविती टाळिया ॥आमुचा कान्हा देवराव ॥ग बाई देवराव ॥३॥
कटी दोरा बिंदली वाघनखे साजिरी । नाचतो श्रीहरी येश्वदेचा ॥ग बाई येश्वदेचा ॥४॥
पायी घागरिया वांकी साजरिया ॥कानींच्या बाळिया ढाल देती ॥ग बाई ढाळ देती ॥५॥
एका जनार्दनी एकत्व शरण ॥जीवे लिंबलोण उतरिती । ग बाई उतरिती ॥६॥
