वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 7. संत निवृत्तीनाथ › 1. संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा › १. संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४ › १. संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा

भव जळ काया पंच तत्व

🙏 7. संत निवृत्तीनाथ · ABH-090037 · अभंग क्र. ९

9.
भव जळ काया पंच तत्व माया । भजन उभया पंढरी रावो ॥१॥
तारक पंढरी प्रत्यक्ष भीमातीरी । ब्रीदे चराचरी बोले वेदु ॥२॥
माया मोहजाळ ममता निखळ । सेविता सकळ होय हरी ॥३॥
निवृत्तिचे फळ सकळ हा गोपाळ । तोडी मायाजाळ संकीर्तने ॥४॥

अर्थ:
पंचतत्वाने बनलेला देह हा भवसागरातील पाणी आहे. व ह्या जळातुन तरण्यासाठी एकमेव उपाय म्हणजे पंढरीरावाचे भजन आहे. भवसागरातुन तरण्यासाठी तारक पंढरीत आहे असे वेद सांगतात. ह्या परब्रह्माच्या सेवे मुळे माया, ममता, मोहजाळातुन सुटका होते. निवृत्तिनाथ म्हणतात ह्याच्या संकीर्तनामुळे माया मोहाचा पाश मला तोडता आला हे साधनेचे फळ आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग