वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 138. श्री विठ्ठल स्तुती आणि भक्तवत्सलता

देवाधिदेवा सर्वत्रां

🙏 4. संत नामदेव · ABH-083777 · अभंग क्र. ५४५

545.
देवाधिदेवा सर्वत्रांच्या जीवा |ऐके वासुदेवा दयानिधी ॥१॥
ब्रह्मा आणि इंद्रा वंद्य सदाशिवा | ऐके वासुदेवा दीनबंधू ॥२॥
चवदा लोकपाळ करिती तुझी सेवा | ऐके वासुदेवा कृपासिंधू ॥३॥
योगियांचे ध्यानी नातुडसी देवा | ऐके वासुदेवा जगद्गुरू ॥४॥
निर्गुण निराकार नाही तुज माया | ऐके कृष्णराया कानडीया ॥५॥
वेडा अविचारी करी मजवर दया | ऐके कृष्णराया शहाणिया ॥६॥
करुणेचा पर्जन्य शिंपी मजवरता या | ऐके कृष्णराया गोजिरिया ॥७॥
नामा म्हणे जरी दाविसील पाया | तरी वदावया स्फूर्ति चाले ॥८॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग