काला
123.
काला
एके ठायी करुनी अन्न । हाते वाढी नारायण ॥१॥
हे पाहोनी सुरवर । चित्ती करिती विचार ॥२॥
धन्य पुण्य गौळीयांचे । आम्हा अन्न मिळे कैचे ॥३॥
एक असे युक्ति । हात धुवील श्रीपति ॥४॥
उच्छिष्टाचे मिषे । देव जळी झाले मासे ॥५॥
हे कळले घन-नीळा । सांगतसे हे गोपाळ ॥६॥
चला वृंदावना जाऊ । नामा ह्मणे उदक घेऊ ॥७॥
