दासीचा जो संग करी ।
3257.
दासीचा जो संग करी । त्याचे पूर्वज नर्क द्वारी ॥१॥
ऐसे सांगो जाता जना । नये कोणाचिया मना ॥धृपद॥
बरे विचारूनी पाहे । तुज अंती कोण आहे ॥२॥
तुका म्हणे रांडलेंका । अंती जासी यमलोका ॥३॥
अर्थ :
जो दासीचा संग करतो त्याचे पूर्वज नरकाच्या द्वारात असतात. असे नीच कर्म कोणीही करु नका असे जर आम्ही लोकांना सांगण्यास गेलो तर ते कोणाच्याही मनाला पटत नाही. बरे ठीक आहे तुला आमचे बोलणे पटत नाही परंतू एक विचार मनाशीच करुन पहा जर तू चांगले कर्म केले नाही तर अंत:काळी तुझ्या मदतीला कोण येणार आहे ? तुकाराम महाराज म्हणतात, अरे रांडेच्या लेका तू जर असे पाप कर्म करत राहशील तर शेवटी अंत:काळी यमलोकीच जाशील.
