वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

तुज असता अनंत कर्णे

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076384 · अभंग क्र. ६६५

665.
तुज असता अनंत कर्णे ।
नये गार्‍हाणे कानी कैसे ॥१॥
काय झाला परिसुनी बधीर ।
द्रौपदीचा आर्तस्वर ॥२॥
गजेंद्रधावा ऐकू आला ।
बहिरे झाला काय आजी ॥३॥
कान्होपात्रेची विनवणी ।
कैसी कानी पडियेली ॥४॥
बहिणी म्हणे घेता सोंग ।
निद्राभंग नोहे कधी ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग