अनंत-नयने म्हणताती त
664.
अनंत-नयने म्हणताती तुला ।
आता का आंधळा जाहलासी ॥१॥
काय माझे हाल न दिसे तव डोळा ।
होसी बा आंधळा देखोनिया ॥२॥
द्रौपदीची लज्जा जाता देखोनीया ।
वस्त्रे नेसावया धावलासी ॥३॥
तुकारामवेद बुडता जो देखसी ।
जली ठाकलासी देखोनिया ॥४॥
बहिणी म्हणे तेव्हा डोळस होतासी ।
आता सहस्त्राक्षी दिसेना का ॥५॥
