कसी घातीयली उडी ।
666.
कसी घातीयली उडी ।
हाक ऐकुनि स्तंभ फोडी ॥१॥
हाक फोडोनी सैराट ।
दुष्टपोट विदारिले ॥२॥
कैसी करूणा आली तेव्हा ।
नये देवा का हो आता ॥३॥
काय वाते जडभारी ।
तुम्हा हरी भेटावया ॥४॥
बहिणी म्हणे वनमाळी ।
करी न रळी भेटीसाठी ॥५॥
666.
कसी घातीयली उडी ।
हाक ऐकुनि स्तंभ फोडी ॥१॥
हाक फोडोनी सैराट ।
दुष्टपोट विदारिले ॥२॥
कैसी करूणा आली तेव्हा ।
नये देवा का हो आता ॥३॥
काय वाते जडभारी ।
तुम्हा हरी भेटावया ॥४॥
बहिणी म्हणे वनमाळी ।
करी न रळी भेटीसाठी ॥५॥