वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

ब्रह्मांडावेगळी वेदा

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076380 · अभंग क्र. ११७

117.
ब्रह्मांडावेगळी वेदासी निराळी ।
चोविसा आगळी विठ्ठलमूर्ति ॥१॥
धन्य ते आगळी गेती प्रेमसुख ।
पाहती श्रीमुख विठ्ठलाचे ॥२॥
सा चौ आठरासी अगम्य चोजवेना ।
ते हे मूर्ति जाणा पंढरीसी ॥३॥
वैकुंठनिवासे स्वइच्छा निर्मिले ।
अक्षर ते क्षरले भक्तिसुखा ॥४॥
अनंत ब्रह्मांडे जयाचे उदरी ।
होती घडामोडी सर्वकाळ ॥५॥
ब्रह्मेणि म्हणे ते हे पंढरीची मूर्ति ।
ठकारली व्यक्ती विठ्ठालवेषे ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग