वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

माझा दीनानाथ दीनबंधु

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-075920 · अभंग क्र. ११६

116.
माझा दीनानाथ दीनबंधु हरि ।
नांदे भीमातीरी पंढरीये ॥१॥
विटे नीट उभा समचरण साजिरी ।
पाऊले गोजिरी सुकुमार ॥२॥
वैजयंती माआळ रूळतसे गळा ।
कासेसी पिवळा पीतांबर ॥३॥
भाळी ऊर्ध्व पुंड्र कुंडले गोमटी ।
चंदनाची उटी सर्वांगासी ॥४॥
सिरी टोप साजे रत्नांचा साजिरा ।
काढियेला तुरा मोतियांचा ॥५॥
जैशा हिर्‍याच्या शोभती दंतपंक्ती ।
बहेणि तया ध्याती हृदयामाजी ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग