संतकृपा जाली ।
118.
संतकृपा जाली ।
ईमारत फळा आली ॥१॥
ज्ञानदेवे घातला पाया ।
उभारिले देवालया ॥२॥
नामा तयाचा किंकर ।
तेणे रचिले आवार ॥३॥
जनार्दन येकनाथ ।
खांब दिल्हा भागवत ॥४॥
तुका जालासे कळस ।
भजन करा सावकास ॥५॥
बहेणि फडकती ध्वजा ।
निरोपण केले वोजा ॥६॥
