वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

(पाईकाचे अभंग)

🙏 3. संत तुकाराम · ABH-079859 · अभंग क्र. ३६३८

3638.
(पाईकाचे अभंग)
प्रजी तो पाईक ओळीचा नाईक । पोटासाठी एक जैसे तैसे ॥१॥
आगळे पाऊल आणिकासी तारी । पळती माघारी तोडिजेती ॥धृपद॥
पाठीवरी घाय म्हणती फटमर । नीधडा अंगे शूर मान पावे ॥२॥
घेईल दरवडा देहा तो पाईक । मारी सकळीक सर्व हरी ॥३॥
तुका म्हणे नव्हे बोलाचे कारण । कमाईचा पण सिद्धी पावे ॥४॥

अर्थ :
प्रजेमध्ये शिपाई निवडला जातो व शिपायामध्येही एक सर्वश्रेष्ठ शिपाई निवडला जातो काही शिपाई पोटाकरता सेवक होतात मग ज्याच्या त्याच्या कर्मानुसार ज्याला त्याला मोल मिळते. युध्दाच्या प्रसंगी ज्या शूर शिपायाचा पाऊल युध्द करण्यासाठी नेहमी पुढे असतो तो सर्वांपेक्षा वेगळा असून तो इतरांनाही तारतो आणि जे भित्रे शिपाई असतात ते माघारी पळतात व शत्रूच्या हाताने तोडले जातात. जे शूर शिपाई असतात ते शत्रूच्या पाठीवर पाय देवून त्यांना मारतात व अशा निधडया शिपायालाच खरा मान प्राप्त होतो. देहावर सर्व वार सहन करुन शत्रूचे सर्व हरण करतो तोच खरा शूर शिपाई होय. तुकाराम महाराज म्हणतात, केवळ वरवर युध्दाच्या गप्पागोष्टी मारुन उपयोग होत नाही तर युध्दाच्या वेळी मी हे असे काही युध्द करीन की सर्व पाहात राहातील असा पण (शपथ) जो करतो त्याचाच पण सिध्दीला जात असतो.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग