तत् शब्दी समर्पी स्व
283.
तत् शब्दी समर्पी स्वधर्माचे फळ ।
होउनी अढळ ब्रह्मनिष्ठ ॥१॥
तयासी ब्राह्मण आम्ही म्हणो शुद्ध ।
मोक्ष तो प्रसिद्ध भेटी होता ॥२॥
अहंकार अंगी जयासी न साहे ।
कर्तेपणी न ये दुजेपण ॥३॥
बहेणि म्हणे ऐसे ब्राह्मण भेटता ।
ब्रह्म-सायुज्यता घरा आले ॥४॥
