वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

वाचे लक्ष याचा जया अ

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-075821 · अभंग क्र. २८२

282.
वाचे लक्ष याचा जया अंगी बोध ।
‘ सत’ शब्द स्वानंद सापडला ॥१॥
तोचि ब्रह्मनिष्ठ ब्राह्मण बोलिजे ।
विज्ञान सहजे देह त्याचे ॥२॥
ज्ञप्ति अखंडता पूर्णता बाणली ।
समाधि लागली असंप्रज्ञ ॥३॥
बहेणि म्हणे चिह्न हेचि ब्राह्मणाचे ।
निश्चये शास्त्राचे सांगितले ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग