देव अंतरला योगही लोप
284.
देव अंतरला योगही लोपला ।
भाव दुर्हाअला प्राणियासी ॥१॥
काय करावे ते संचित वोखटे ।
विषय गोमटे वाटताती ॥२॥
नाम नये मुखा नावडे ते भक्ति ।
जिवासी विरक्ति नयेचि ते ॥३॥
बहेणि म्हणे संत साधु महानुभाव ।
नावडे तो ठाव पातक्यासी ॥४॥
