पुंडलिकालागुनी म्हणे
386.
पुंडलिकालागुनी म्हणे पांडुरंग |सखा जिवलग तूंचि माझा ॥१॥
न पाहासी वास बोलसी उदास |सांडोनिया आस सर्वस्वाची ॥२॥
वैकुंठ सांडोनि आलो तुजपाशी |का गा न बोलसी भक्तराया ॥३॥
पितॄभजनाचा जालासी अधिकारी |केली बा पायरी वैकुंठासी ॥४॥
माग बापा कांही आवडे ते घेई |मज वाटे हॄदयी घालावाची ॥५॥
नामा म्हणे देवा स्वामी मुगुटमणी |उभा कर ठेवुनी कटीवरी ॥६॥
