येक वेळ भेटी आलो भक
387.
येक वेळ भेटी आलो भक्तराया |स्फुरती माझ्या बाह्या क्षेमालागी ॥१॥
ऊठ पुंडलिका परतोनिया पाहे |जीवींचे आर्त काय सांग मज ॥२॥
जीवाची शिराणी फेडी डोळ्यांची |वास श्रीमुखाची पाहू देई ॥३॥
हेची आर्त धरोनी आलो असे जीवी |ते तू सर्व पुरवी भक्तराया ॥४॥
नामयाचा स्वामी क्रुपेचा कोंवळा |म्हणऊनि उतावळा भक्तालागी ॥५॥
