वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 10. निवडक अभंग › 5. तुकाराम निवडक अभंग

ऐका रे जना तुझ्या स्

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-072782 · अभंग क्र. १५७

157.
ऐका रे जना तुझ्या स्वहिताच्या खुणा । पंढरीचा राणा मनामाजी स्मरावा ॥१॥
मग कैंचे रे बंधन वाचे गाता नारायण । भवसिंधु तो जाण येचि तीरी सरेल ॥२॥
दास्य करील कळिकाळ बंध तुटेल मायाजाळ । होतील सकळ रिद्धिसिद्धि म्हणियार्‍या ॥३॥
सकळ शास्त्रांचे सार हे वेदांचे गव्हर । पाहाता विचार हाचि करिती पुराणे ॥४॥
ब्राम्हण क्षत्रिय वैश्य -शूद्र चांडाळाही अधिकार । बाळे नारीनर आंदिकरोनि वेश्याही ॥५॥
तुका म्हणे अनुभवे आम्ही पाडियले ठावे । आणीकही दैवे सुख घेती भाविके ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग