वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 10. निवडक अभंग › 5. तुकाराम निवडक अभंग

अवघ्या वाटा झाल्या क

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-072556 · अभंग क्र. १५८

158.
अवघ्या वाटा झाल्या क्षीण । कली न घडे साधन ।
उचित विधी विधान । न कळे न घडे सर्वथा ॥१॥
भक्तिपंथ बहु सोपा । पुण्य नागवे या पापा ।
येणे जाणे खेपा । येणेचि एके खंडती ॥२॥
उभारोनि बाहे । विठो पालवीत आहे ।
दासा मीचि साहे । मुखे बोले आपुल्या ॥३॥
भाविक विश्‍वासी । पार उतारिले त्यासी ।
तुका म्हणे नासी । कुतर्क्याचे कपाळी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग