भक्ति असो मुक्ति घाल
2112.
भक्ति असो मुक्ति घाला रे बाहेरी । बहुता चाळविले चाळायाची थोरी ॥१॥
भक्ति ते राहो मुक्ति ते जावो । मुक्तिमाजीं भावो नाही नाही ॥२॥
मुक्ति चाळा लाउनी सेखीं वोसंडी । नेणे ऐसे किती केले पाषांडी ॥३॥
मुक्तिचेनी योगें नामदेव शुक । त्यांचाहीं विकल्प मानिताती लोक ॥४॥
नाम संकीर्तन भक्ति मुक्तीसी धाक । संवादे दोघेही राहो माझी भाक ॥५॥
उपजोनिया पोटी भक्ति ते ग्रासी । मातृहत्यारीं मुक्ति कवण पोसी ॥६॥
एका जनार्दनी सेविता चरणरज । मुक्ति सेवा करी सांडुनिया लाज ॥७॥
