भक्तिप्रेमाविण ज्ञान
2113.
भक्तिप्रेमाविण ज्ञान नको देवा । अभिमान नित्य नवा तयामाजीं ॥१॥
प्रेम सुख देई सुख देई । प्रेमेंविण नाही समाधान ॥२॥
रांगवेनें जेवी शृंगारु केला । प्रेमेविण जाला ज्ञानी तैसा ॥३॥
एका जनार्दनी प्रेम अति गोड । अनुभवीं सुरवाड जाणतील ॥४॥
