गयनी गव्हार कृपेचा उ
168.
गयनी गव्हार कृपेचा उद्धार । वरुषला उदार अमृतमय ॥१॥
तोंची बोध साचा मुक्ताईसी लाटा । चालिले वैकुंठा समारंभे ॥२॥
कुंचे गरुडटके टाळ श्रुति हरि । चालिले गजरी हरिसंगे ॥३॥
निवृत्ति वैष्णव सोपान खेचर । करिताती गजर हरिनामे ॥४॥
अर्थ:
माझे श्री गुरु गहिनीनाथांनी माझ्यावर उदार अमृतमय कृपेचा वर्षाव केला आहे. तोच प्रेमवर्षाव मी नित्यमुक्त मुक्ताईवर केल्यांने ती वैकुठांतील समारंभ येथेच भोगत आहे. टाळ, विणा व गरुडटके घेऊन ते हरिनामाचा उच्चार करत हरि बरोबर चालतात. निवृतिनाथ म्हणतात, हे वैष्णव असलेले सोपानदेव विसोबा खेचरादी सर्वजण विठ्ठलनामाचा गजर करतात.
